Ad will apear here
Next
माझ्या मराठीची गोडी

‘जिची थोरवी दररोज नवे रूप दाखवते आणि जिच्यासमोर आपोआप नतमस्तक व्हायला होतं,’ असं म्हणणारी वि. म. कुळकर्णी यांची ‘माझ्या मराठीची गोडी’ ही कविता आज पाहू या.
.................
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत!

वि. म. कुळकर्णीज्ञानोबांची-तुक्यांची
मुक्तेशाची-जनाईची 
माझी मराठी चोखडी
रामदास-शिवाजीची

‘या रे या रे अवघेजण
हाक माय मराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची!

डफ-तुणतुणें घेऊन 
उभी शाहीर मंडळी
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर!

नव्या प्राणाची ‘तुतारी’ 
कुणी ऐकवी उठून
‘मधुघट’ अर्पी कुणी
कुणी ‘माला’ दे बांधुन!

लेक लाडका एखादा
गळां घाली ‘वैजयंती’
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती
 
हिचें स्वरूप देखणें
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्रीं प्रभा दाटे
सात्विकाची-कांचनाची!

कृष्णा-गोदा-सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशीर्वाद
हिच्या मुखीं वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवें रूप दावी
अवनत होई माथा
मुखीं उमटते ओवी!
- वि. म. कुळकर्णी

(वि. म. कुळकर्णी यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZOMCJ
Similar Posts
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.
मराठीची लिपी मराठीची लिपी म्हणून, बोली म्हणून असलेली वैशिष्ट्यं सांगणारी ‘आमुची लिपी’ ही कविता आज पाहू या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी ती लिहिली आहे.
माझी बोली असे मराठी मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language